टोकियो - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिची जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड शनिवारी खंडित झाली. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आठव्या मानांकित जर्मनीच्या ज्युलियन श्नेक हिने चतुर्थ मानांकित साईनावर 21-19, 21-10 अशी मात केली. साईनाच्या पराभवामुळे या स्पर्धेच्या एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. साईना विरुद्ध ज्युलियन हा सामना 39 मिनिटे चालला. पहिल्या गेममध्ये साईनाने चांगली लढत दिली. सुरवातीपासून दोन्ही खेळाडूंची बरोबरीच होती. मात्र, 19-19 असे गुण झाले असताना ज्युलिअनने सलग दोन गुण जिंकत पहिला गेम आपल्या नावे केला. पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिल्यानंतर दुसरा गेमही चुरशीचा होईल, असे वाटत होते. दुसऱ्या गेमच्या सुरवातीला दोघींचेही गुण सारखेच होते. पण 10-10 अशी बरोबरी असताना ज्युलिअनने सलग अकरा गुण जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यामध्ये ज्युलिअनने नेटजवळ चपळाईने खेळ करत साईनाची दमछाक करण्यावरच भर दिला. याआधी साईना आणि ज्युलिअनमध्ये सात लढती झाल्या होत्या. त्यामध्ये साईनाने पाच विजय मिळविले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच साईनाला आठव्या मानांकित ज्युलिअनकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साईना जागतिक क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. खालावलेला फॉर्म चिंताजनक नाही साईनाची कामगिरी सध्या खालावली असली, तरीही त्यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""गेल्या वर्षी तिची कामगिरी चांगली झाली होती. या वर्षी कामगिरी काहीसी खालावली आहे. पण तरीही यात चिंताजनक काही नाही. फॉर्ममध्ये नसूनही ती सहज उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तिच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, सध्या तिच्याकडून अगदी किरकोळ चुका होत आहेत. थोड्याशा सरावाने या त्रुटी दूर होतील आणि साईना पुन्हा दर्जेदार कामगिरी करू शकेल.'' | |
-
साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात
Admin
9:39 AM
Admin
Keshav Upadhye | Chief Spokesperson, BJP, Maharashtra | Media strategist, Image consultant, Strategic thinker.
You might also like
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments:
Post a Comment