लंडन. - ‘वाका वाका’ फेम प्रसिद्ध कोलंबियन गायिका शाकिरा आणि पिंक फ्लॉयडच्या रॉजर वॉटर्स या दोघांनी मिळून 16 दशलक्ष अमेरिकी डॉलरमध्ये एक कॅरेबियन बेटच विकत घेतले आहे. बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू गेरॉर्ड पीकबरोबर सध्या डेटिंगवर जात असलेल्या 34 वर्षीय शाकिरा आणि 68 वर्षीय संगीतकार वॉटर्स यांनी बहमासच्या उत्तरेला असलेले बाँड्स के हे बेट भागीदारीमध्ये विकत घेतले आहे. या ठिकाणी सुट्यांमध्ये मौजमजा करणा-या कोट्यधीशांसाठी रिसॉर्ट बांधण्यात येणार आहे. खासगी बीचची व्यवस्था असलेले लक्झरी हॉलिडे होम्स आणि हॉटेल्स बांधून पर्यटक आकर्षित करण्याची या दोघांचीही योजना आहे. या ठिकाणी कलादालन विकसित करण्याचीही शाकिरा आणि वॉटर्स यांची योजना आहे. हे एक अतिशय सुंदर बेट असून निसर्गसौंदर्याने नटलेले हे बेट पर्यटकांना भुरळ घालणारे असल्याचे एका कॅरेबियन रियल इस्टेट फर्मचे उपाध्यक्ष जॉन ख्रिस्ट यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments:
Post a Comment